प.पू. रामभाऊस्वामी यांच्या शालीची पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी !

प.पू. रामभाऊस्वामी यज्ञकुंडात
स्वतःला समर्पित करतांना अंगावर घेत असलेल्या शालीची
आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी पिप तंत्रज्ञानाच्या
साहाय्याने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

      तंजावर, तमिळनाडू येथील ७८ वर्षीय संत प.पू. रामभाऊस्वामी सर्वांचे कल्याण व्हावे, साधकांचे रक्षण व्हावे आणि जगात शांतता नांदावी, यासाठी वर्ष १९७० पासून यज्ञ करत आहेत. या यज्ञांचे वैशिष्ट्य म्हणजे यात ते स्वतःची आहुती देतात. ते धगधगत्या यज्ञकुंडात जाऊन प्रत्येक वेळी १० मिनिटांपर्यंत स्वतःला समर्पित करतात. त्या वेळी त्यांच्या अंगावर एक शाल असते. या शालीचा तिच्याभोवतीच्या वायूमंडलावर कसा परिणाम होतो, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्याच्या उद्देशाने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. वैज्ञानिक चाचणीसाठी
निवडलेली प.पू. रामभाऊस्वामी यांची शाल

      पेठेत (बाजारात) सहज उपलब्ध होणारी ही एक गडद लाल रंगाची लोकरीची शाल आहे. १५.१.२०१६ या दिवशी ही शाल गोवा येथील सनातन आश्रमात झालेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी प.पू. रामभाऊस्वामी यांनी वापरलेली आहे. ही शाल त्यांना यज्ञाच्या केवळ एक दिवस आधी देण्यात आली होती. या यज्ञात प.पू. रामभाऊस्वामींनी धगधगत्या यज्ञकुंडात जाऊन अनेक वेळा स्वतःला समर्पित केले होते. त्या वेळी ही शाल त्यांच्या अंगावर होती. असे असूनही यज्ञातील अग्नीमुळे ही शाल केवळ काही ठिकाणी अत्यंत अल्प प्रमाणातच जळलेली आहे. याविषयी प.पू. रामभाऊस्वामी म्हणाले, ही शाल यज्ञाच्या अग्नीव्यतिरिक्त अन्य सर्वसाधारण अग्नीच्या संपर्कात आली असती, तर ती पूर्णपणे जळली असती.

२. चाचणीचे स्वरूप

      या चाचणीत शालीची प.पू. रामभाऊस्वामी यांनी यज्ञात वापर करण्यापूर्वी आणि यज्ञात वापर करून झाल्यानंतर, अशा दोन वेळी घेतलेली पिप छायाचित्रे निवडली आहेत. या शालीचा वातावरणावर काय परिणाम होेतो, हे या चाचणीद्वारे जाणता आले.

३. पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स
फोटोग्राफी) तंत्रज्ञानाची ओळख !

      या तंत्रज्ञानाद्वारे आपण एखाद्या वस्तूची सामान्यपणे डोळ्यांना न दिसणारी अशी रंगीत प्रभावळ (ऑरा) पाहू शकतो. पिप या संगणकीय प्रणालीला व्हिडीओ कॅमेर्‍याशी जोडून त्याद्वारे वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांची ऊर्जाक्षेत्रे विविध रंगांत पहाता येतात. यात सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा आहे. त्या रंगांचे विवरण ५ अ या सारणीतील पहिल्या स्तंभात दिले आहे.

४. चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता

अ. या चाचणीची पिप छायाचित्रे घेण्यासाठी विशिष्ट कक्ष (खोली) वापरण्यात आला. या कक्षाच्या भिंती, छत आदींच्या रंगांचा शालीच्या प्रभावळीतील रंगांवर परिणाम होऊ नये, यासाठी भिंती, छत आदींना पांढरा रंग दिला होता.

आ. संपूर्ण चाचणीच्या वेळी कक्षातील प्रकाशव्यवस्था एकसारखीच ठेवली होती, तसेच कक्षाबाहेरील हवा, प्रकाश, उष्णता यांचा कक्षातील चाचणीवर परिणाम होऊ नये, यासाठी चाचणीच्या वेळी कक्ष बंदिस्त ठेवण्यात आला होता.

५. निरीक्षणे आणि त्यांचे विवरण

५ अ. पिप छायाचित्रांत दिसणार्‍या
प्रभावळींचे रंग, ते कशाचे दर्शक आहेत आणि
त्यांच्या प्रमाणात होणारी वाढ किंवा घट (पिप छायाचित्रे १ ते ३)

      वस्तू ठेवण्यापूर्वीच्या (मूलभूत नोंदीच्या) तुलनेत वस्तू ठेवल्यानंतरच्या प्रभावळीतील रंगाच्या प्रमाणात वाढ किंवा घट होते. ही वाढ किंवा घट त्या वस्तूतून प्रक्षेपित होणार्‍या त्या रंगाशी संबंधित स्पंदनांच्या प्रमाणानुसार असते, उदा. वस्तूतून चैतन्याच्या स्पंदनांचे प्रक्षेपण पुष्कळ प्रमाणात झाल्यास प्रभावळीतील पिवळ्या रंगाचे प्रमाण वाढते, तर चैतन्याच्या स्पंदनांचे प्रक्षेपण न झाल्यास किंवा इतर स्पंदनांच्या तुलनेत अल्प प्रमाणात झाल्यास प्रभावळीतील पिवळ्या रंगाचे प्रमाण घटते. हे लक्षात घेऊन खालील सारणी वाचावी.

tab1

टीप १ : या चाचणीमध्ये आपण एखाद्या घटकामुळे वातावरणात झालेल्या पालटाची नोंद घेतो; पण वातावरणात सातत्याने पालट होत असल्यामुळे घटकाची चाचणी करण्यापूर्वी घटक ठेवणार असलेल्या वातावरणाची नोंद प्रथम घ्यावी लागते. हिला मूलभूत नोंद म्हणतात. त्यामुळे चाचणीसाठी शाल ठेवण्यापूर्वीच्या रिक्त स्थानाच्या निरीक्षणाची अन् नंतर तेथे शाल ठेवून निरीक्षणांची नोंद केली.

टीप २ : याच्या प्रभावळीची तुलना मूलभूत नोंदीशी केली आहे.

टीप ३ : घटकाच्या अंतर्बाह्य स्तरांवरील नकारात्मक स्पंदने नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता

टीप ४ : थोड्या प्रमाणात आनंदाची आणि पुष्कळ प्रमाणात पवित्रतेची, तसेच सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक उपायक्षमतेची स्पंदने प्रक्षेपित झाली, हे या सारणीतील सूत्र क्र. १, २ अन् ३ यांवरून स्पष्ट होते.

टीप ५ : पुष्कळ प्रमाणात सकारात्मकतेची आणि सात्त्विकतेची स्पंदने प्रक्षेपित झाली, हे या सारणीतील सूत्र क्र. ८ अन् ९ यांवरून स्पष्ट होते.

टीप ६ : घटकाच्या केवळ बाह्य स्तरावरील नकारात्मक स्पंदने नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता

५ आ. पिप छायाचित्रांत दिसणार्‍या विविध रंगांच्या प्रमाणानुसार
आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी असणार्‍या स्पंदनांचे प्रमाण (टक्के)

tab2

टीप : छायाचित्रांत दिसणार्‍या विविध रंगांचे प्रमाण ठरवण्यासाठी पिप छायाचित्रावर संगणकीय प्रणालीद्वारे आलेख कागदावर असतात, तशा अनेक चौकटी योजल्या. त्यानंतर छायाचित्रातील एकूण चौकटी आणि त्यांच्या तुलनेत प्रभावळीतील प्रत्येक रंगाने व्यापलेल्या चौकटी यांची संख्या मोजली. या संख्येचे टक्क्यांमध्ये रूपांतर करून प्रभावळीतील प्रत्येक रंगाचे प्रमाण सर्वसाधारणपणे निश्‍चित केले आहे.

६ . विवरण

६ अ. प.पू. रामभाऊस्वामी यांनी यज्ञात वापर करण्यापूर्वीची शाल : यातून उच्च प्रतीची सकारात्मक स्पंदने पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित झाल्याने वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे.

६ आ. प.पू. रामभाऊस्वामी यांनी यज्ञात वापर करून झाल्यानंतरची शाल : यातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाल्याने वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण थोडे वाढले आहे.

७. निष्कर्ष

७ अ. प.पू. रामभाऊस्वामी यांनी यज्ञात वापर करण्यापूर्वीची शाल

या शालीत उच्च प्रतीची सकारात्मक स्पंदने पुष्कळ प्रमाणात आहेत. ही शाल सनातन आश्रमासारख्या अत्यंत सात्त्विक वास्तूमध्ये यज्ञापूर्वी एक दिवस आधीपासून प.पू. रामभाऊस्वामी यांच्या सात्त्विक सान्निध्यात असल्याने तिच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक स्पंदने निर्माण झाली आहेत.

७ आ. प.पू. रामभाऊस्वामी यांनी
यज्ञात वापर करून झाल्यानंतरची शाल

सर्वसाधारणपणे जळलेल्या वस्तूंमध्ये त्रासदायक स्पंदने आढळतात; परंतु ही शाल थोडी जळलेली असूनही तिच्यात सकारात्मक स्पंदने पुष्कळ प्रमाणात टिकून राहिली आहेत. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचे कारण म्हणजे ही शाल प.पू. रामभाऊस्वामी यांच्यासारख्या संतांनी वापरलेली आहे, तसेच ती सर्वसाधारण अग्नीच्या नव्हे, तर यज्ञीय अग्नीच्या संपर्कात येऊन जळली आहे.

       या चाचणीतून संतांचा सहवास आणि यज्ञ यांचे महत्त्व लक्षात येते.

संतांनी परिधान केलेली शाल
यज्ञीय अग्नीच्या संपर्कात येऊन
थोडीशी जळल्यावरही तिच्यातील सकारात्मक
स्पंदने टिकून रहातात, हे दर्शवणारी पिप छायाचित्रे !

ganesh_yag_shawl1ganesh_yag_shawl ganesh_yag_shawl3
संशोधन करून ज्ञानप्राप्तीचा
आनंद मिळवणे आणि मोक्षप्राप्ती करणे,
हा हिंदूंचा उद्देश असल्याने हिंदूच खरे संशोधक !

सूचना : ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) छायाचित्र क्र. २ आणि ३ यांची तुलना मूलभूत प्रभावळीशी (छायाचित्र क्र. १) करतांना छायाचित्रातील पटल, तसेच शाल यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.

वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश

      एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही, तसेच तो आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्द प्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली, तरच ती खरी वाटते.
– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१६.१.२०१६)

टीप :  MAVV  : Maharshi Adhyatma Vishwavidyalay

ईमेल : [email protected]