कपड्यांवरील वेलवीण (नक्षी)

Article also available in :

कपडे निवडतांना कपड्यांवरची वेलवीण अर्थपूर्ण असावी. चित्रविचित्र आकृत्या असलेले कपडे मनुष्याला घातक ठरतात. याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.

१. कलियुगात वेलवीण (नक्षी) म्हणून चित्रविचित्र आकृत्यांचा होणारा वापर मनुष्यजिवास घातक

‘आजकाल कलियुगात विविध प्राण्यांच्या आकृत्या असलेले कपडे, भयानक भुतांचे तोंडवळे (चेहरे) असलेले कपडे, विविध ठिकाणी फाटल्यासारखी वेलवीण असलेले कपडे इत्यादी सर्रास पहायला मिळतात. अशा कपड्यांच्या आकृतीबंधांत घनीभूत झालेल्या त्रासदायक लहरी कालांतराने जिवाच्या वृत्तीवर परिणाम करतात. असे चित्रविचित्र कपडे परिधान करणारा जीव कालांतराने तमोगुणी बनतो.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, आषाढ शुद्ध चतुर्थी, कलियुग वर्ष ५११० (६.७.२००८), सायं. ७.०९)

२. कपड्यांवरील वेलवीण सात्त्विकतेच्या दृष्टीने कशी असावी ?

२.अ. वेलवीण अर्थहीन नसावी

अर्थहीन वेलवीणची (नक्षीची) उदाहरणे

अर्थहीन वेलवीणची (नक्षीची) उदाहरणे

कपड्यांवरची वेलवीण निवडतांना ती अर्थपूर्ण असावी, उदा. ठिपके, पाने, फुले आणि वेली.

२.आ. वेलवीणचा आकार

वेलवीणचा आकार फार मोठा नसावा.

२.इ. अणकुचीदार टोके असलेली वेलवीण नसावी

याचे एक उदाहरण म्हणजे पानाफुलांची वेलवीण निवडतांना शेजारी दिलेल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे अणुकूचीदार टोके असलेली पानेफुले नसावीत. वेलवीण कोमल (नाजूक) आणि आकर्षक असावी.

२.ई. वेलवीण पुष्कळ जवळ जवळ नसावी

वेलवीण पुष्कळ जवळ जवळ असल्यास त्या वेलविणींमधून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होतात. आकाराने चांगली वेलवीणही एकमेकांच्या पुष्कळ जवळ असेल, तर त्रासदायक स्पंदने निर्माण करते. वेलवीण जेवढी सुटसुटीत असेल, तेवढी ती निर्गुण तत्त्वाकडे जाणारी असते आणि तिच्यातून चांगली स्पंदने येतात.

३. कपड्यावर रेषा असल्यास त्या उभ्या, आडव्या कि तिरक्या असाव्यात ?

३.अ. रेषांच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग

१. सूक्ष्मातील प्रयोगाचा अर्थ

सर्वप्रथम सूक्ष्मातील प्रयोग म्हणजे काय, हे समजून घेऊ. स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, ते म्हणजे ‘सूक्ष्म’. एखाद्या गोष्टीकडे पाहून चांगली किंवा त्रासदायक स्पंदने जाणवतात का किंवा एखादी अनुभूती येते का, याचा सूक्ष्मातून अभ्यास करणे म्हणजे ‘सूक्ष्मातील प्रयोग’ करणे. यात सूक्ष्म-मनाच्या आधारे एखाद्या गोष्टीविषयी चांगले-वाईट जाणवते आणि सूक्ष्म-बुद्धीमुळे ते चांगले किंवा वाईट का आहे, त्याचे कारण कळते.

सर्वसाधारण व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते, तर मोक्षाला गेलेल्या व्यक्तीची पातळी १०० टक्के असते. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता सर्वसाधारण व्यक्तीत नसते. साधनेने ३५ टक्क्यांपेक्षा जास्त पातळी झाल्यावर सूक्ष्मातील थोडेफार कळू लागते आणि पुढे जसजशी पातळी वाढते, तसतशी ही क्षमता वाढते. गुरुकृपा असल्यास पातळी अल्प असतांनाही सूक्ष्मातील कळू शकते.

२. प्रत्यक्ष प्रयोग

पुढे दिलेल्या आकृती ‘अ’, ‘आ’ आणि ‘इ’ यांच्याकडे प्रत्येकी २ मिनिटे पाहून काय वाटते, ते अनुभवा आणि त्यानंतरच त्यापुढील लिखाण (मजकूर) वाचा.

आकृती ‘अ’कडे पाहून सर्वांत चांगले वाटते, ‘आ’कडे पाहून थोडे चांगले वाटते, तर ‘इ’कडे पाहून त्रासदायक वाटते. आडव्या रेषांपेक्षा उभ्या रेषांमधून चांगली स्पंदने येतात; कारण आडव्या रेषा पृथ्वीतत्त्वाशी निगडित असतात, तर उभ्या रेषा आकाशतत्त्वाशी निगडित असतात. तिरक्या रेषांमधून दोन दिशांची मिश्र स्पंदने येत असल्यामुळे त्यांतून त्रासदायक स्पंदने निर्माण होतात.

यावरून उभ्या रेषा असलेले कपडे निवडणे अधिक योग्य आहे, हे लक्षात येते.’ – सनातनच्या साधक-चित्रकार सौ. जान्हवी शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

रेषा

रंग

तत्व

१. उभ्या सर्व तारक रंग तारक
२. आडव्या तांबडा मारक

सर्वसाधारण मनुष्याची प्रकृती तारक असल्याने त्याला मारक तत्त्वाचा त्रास होण्याची शक्यता असते. कपड्यांवरील आडव्या रेषांतून मारक तत्त्व प्रक्षेपित होत असल्यामुळे त्यापासून त्रास होण्याची शक्यता असल्याने आडव्या रेषा असलेले कपडे वापरू नयेत.

४. वेलवीण असलेल्या कपड्यांपेक्षा वेलवीण नसलेले कपडे अधिक योग्य का ?

‘वस्त्र वेलवीणविरहित असेल, तर ते जास्त सात्त्विक समजले जाते; कारण असे वस्त्र आकृतीविरहित असल्याने त्याला ब्रह्मांडातून येणारा निर्गुण चैतन्यलहरींचा प्रवाह आकृष्ट करण्यात, तसेच कार्याच्या आवश्यकतेप्रमाणे तो वायूमंडलात अधिकतम (कमाल) स्तरावर प्रक्षेपित करण्यात आकारसदृशतेचा असा कोणताच अडथळा येत नाही.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, आषाढ शुद्ध चतुर्थी, कलियुग वर्ष ५११० (६.७.२००८), सायं. ७.०९)

(वेलवीणची निवड करतांना ‘वेलवीण सात्त्विक आहे कि नाही’, हे नीट पारखून घ्यावे लागते. वेलवीणविरहित कपड्यांच्या संदर्भात मात्र ही समस्या उद्भवण्याचा प्रश्नच नसतो. अशा दृष्टीनेही वेलवीणविरहित कपडे घालणे केव्हाही हिताचेच ठरते.)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?’

Leave a Comment