हिंदूंनो, शत्रू सीमा ओलांडत आहे; म्हणून स्वतःच्या रक्षणाची सिद्धता करा !
‘देवतांनी आसुरी शक्तींवर विजय प्राप्त केल्याचा दिवस म्हणजे विजयादशमी ! विजयादशमी म्हणजे सीमोल्लंघन करून शत्रूच्या राज्यात जाऊन विजय मिळवण्याची सनातन परंपरा सांगणारा सण आहे. सांप्रतकाळातही आसुरी शक्ती भारताचे विघटन करण्यास आतुर आहेत. बांगलादेशात अराजक निर्माण झाले असून आतंकवादी शक्ती तेथील अल्पसंख्य हिंदूंवर अनन्वित अत्याचार करत आहेत. आतंकवादी शक्तींनी काश्मीर, आसाम, बंगाल, पूर्वाेत्तर राज्ये अक्षरशः पोखरलेली आहेत. नक्षलवादी शक्ती भारताच्या ३० टक्के भूभागावर समांतर राज्य करत आहेत. आतंकवादी आणि नक्षलवादी शक्तींचे छुपे हस्तक संपूर्ण भारतात गृहयुद्धाची व्यूहरचना करत आहेत. आतंकवादी शक्ती देहलीपासून गल्लीपर्यंत दंगलींच्या माध्यमातून एकप्रकारे सीमा ओलांडून हिंदूंचा पराभव करत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत हिंदूंनो, शत्रू सीमा ओलांडत आहे; म्हणून स्वतःच्या रक्षणाची सिद्धता करा !
हिंदूंनो, विजयादशमी का साजरी करायची असते ? किंवा अपराजितापूजन आणि शस्त्रपूजन का केले जाते ? याचा धर्मबोध घ्या. खरे सीमोल्लंघन म्हणजे ‘विजयासाठी शत्रूची सीमा उल्लंघून युद्ध पुकारणे’, अपराजितादेवीचे पूजन म्हणजे ‘विजयासाठी देवीकडे शक्ती मागणे’ आणि थोरामोठ्यांना आपट्याची पाने देणे म्हणजे ‘विजयश्री प्राप्त करण्यासाठी थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेणे’ होय.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक, सनातन संस्था