Home > सनातन वृत्तविशेष > ‘जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी’चे कुलगुरु डॉ. रोशन लाल रैना यांची सनातन आश्रम आणि आध्यात्मिक संशोधन केंद्र यांना सदिच्छा भेट ! ‘जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी’चे कुलगुरु डॉ. रोशन लाल रैना यांची सनातन आश्रम आणि आध्यात्मिक संशोधन केंद्र यांना सदिच्छा भेट ! December 15, 2021 Article also available in :Hindi Share this on : डॉ. रोशन लाल रैना (डावीकडे) यांना सनातनच्या आश्रमात चालू असलेल्या कला आणि अक्षरयोग यांच्याशी संबंधित कार्याविषयीची माहिती देतांना श्री. अमोल हंबर्डे रामनाथी, गोवा – ‘जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी’चे कुलगुरु डॉ. रोशन लाल रैना यांनी १२ डिसेंबर या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम आणि आध्यात्मिक संशोधन केंद्र यांना भेट दिली. त्यांनी येथे चालू असलेले आध्यात्मिक संशोधन, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रसार यांच्या संदर्भातील कार्य आस्थेने जाणून घेतले. सनातनचे साधक श्री. अमोल हंबर्डे यांनी त्यांना आश्रमात चालू असलेल्या या कार्याविषयी विस्ताराने माहिती दिली. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अंतर्गत करण्यात येणार्या आध्यात्मिक संशोधनाच्या कार्याविषयी श्री. शॉन क्लार्क यांनी डॉ. रोशन लाल रैना यांना माहिती दिली. विश्वविद्यालयाच्या अंतर्गत संगीत आणि नृत्य यांच्याशी संबंधित कार्य अन् संशोधन यांविषयीचा परिचय ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर यांनी करून दिला, तर कला आणि अक्षरयोग यांतर्गत चालू असलेल्या व्यापक कार्याविषयी सौ. जान्हवी शिंदे यांनी डॉ. रैना यांना अवगत केले. आयुर्वेदासंबंधीच्या कार्याविषयीची माहिती वैद्या (कु.) अपर्णा महांगडे आणि वैद्या (कु.) शर्वरी बाकरे यांनी दिली. या प्रसंगी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, तसेच श्री. महावीर श्रीश्रीमाळ उपस्थित होते. डॉ. रैना म्हणाले, ‘‘सनातन आश्रमाला दिलेली भेट अविस्मरणीय आहे. शिक्षण आणि संशोधन यांविषयीचा आपला दृष्टीकोन अन् कार्य, हे भारत आणि जग यांना अधिक चांगले ठिकाण करेल. यातून मनुष्य आनंदी जीवन जगू शकेल.’’ डॉ. रोशन लाल रैना यांचा परिचय डॉ. रोशन लाल रैना डॉ. रोशन लाल रैना हे ‘जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी’चे कुलगुरु म्हणून कार्यरत आहेत. याआधी डॉ. रैना हे भारतातील प्रथितयश ‘आयआयएम् (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट), लखनऊ’मध्ये ‘व्यवस्थापकीय संवाद’ यासंदर्भातील विषयांचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. या शैक्षणिक संस्थेचा कायाकल्प करण्यात डॉ. रैना यांचे मोलाचे योगदान आहे. डॉ. रैना हे देहलीतील ‘लाल बहादूर शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’चे संचालकही राहिले आहेत. याखेरीज अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आदी देशांतील प्रसिद्ध विद्यापिठांमध्येही त्यांनी व्यवस्थापन क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. त्यांनी कृषी मंत्रालय, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग, तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अशा भारत सरकारच्या अंतर्गत येणार्या विविध विभागांसाठी महत्त्वाचे कार्य केले आहे. डॉ. रैना यांनी आतापर्यंत ३ पुस्तकांचे लेखन केले असून १० पुस्तकांचे संपादन केले आहे. त्यांनी ११८ हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. संदर्भ : दैनिक सनातन प्रभात Share this on : संबंधित लेख सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज अमृत महोत्सवी सन्मान सोहळापैशांची देवाण-घेवाण, आर्थिक किंवा भूमीचे व्यवहार करणे, तसेच विवाह जुळवणे आदी वैयक्तिक गोष्टी आपल्या जबाबदारीवर...कुंभपर्वाच्या सेवेसाठी सुस्थितीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता !धनत्रयोदशी निमित्त धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...माधवनगर (सांगली) येथील सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन !