वास्तू आणि दिशा

Article also available in :

वास्तू आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीशी निगडित असल्याने बांधकामापूर्वी अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. समृद्धी, यश, शांती, चैतन्य यांचा प्रत्यक्ष संबंध वास्तूशी जोडला जात असल्याने वास्तूची निवड आणि बांधकाम करतांना नियोजन अन् वास्तूशास्त्रातील मूलभूत नियम यांचा आग्रह धरतांना बहुतेक जण दिसतात. यामागे अंधश्रद्धेचा भाग नसतो. घर बांधतच आहोत, तर वास्तूचे काही नियम पाळून वास्तूशास्त्राप्रमाणे घर बांधण्याकडे बहुतेकांचा कल असतो.

१. घरासाठी प्लॉट कोणत्या दिशेला असावा ?

 

  • घर बांधण्यापूर्वी सर्वांत महत्त्वाचे काम म्हणजे प्लॉटची निवड. प्लॉटच्या उत्तर दिशेला किवा पूर्वेकडे मोठा वृक्ष नाही याची निश्चिती करतांनाच दक्षिणेस खड्डा किवा विहीर नसावी याची दक्षता घ्यावी.
  • प्लॉटचा आकार त्रिकोणी नसावा. तो चौरस किंवा समचतुष्कोण आकार घर बांधण्याकरता आदर्श मानला जातो.
  • वाकड्या-तिकड्या आणि अनियमित आकाराच्या प्लॉटवर बांधकाम केल्यास आर्थिक हानी किंवा मतभेदात वाढ होण्याची शक्यता असते.
  • मध्यभागी प्लॉट बसका असल्यास अनेक क्षेत्रांत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पूर्व दिशेकडे तोंडवळा असणारे घर शुभ मानले जाते.
  • उत्तर दिशेकडील प्लॉटही उत्तम.
  • नदी, तलाव, विहीर, झरे प्लॉटच्या पूर्वेस किवा उत्तरेस असावे.

 

२. घराचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेला हवे ?

घराचा मुख्य दरवाजा किंवा प्रवेशद्वार कोणत्या दिशेने असावे यावर घराचे सौंदर्य खुलण्यासमवेतच इतरही गोष्टी निगडित असतात. घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा. स्वयंपाक घर मोकळे, हवेशीर असण्यासोबतच त्याची दिशाही लक्षात घ्यावी. गृहिणी स्वयंपाक करतांना तोंड दक्षिणेकडे नसले म्हणजे झाले. दक्षिण किवा पश्चिमेस शौचालय ठेवल्यास योग्यच. अगदी दुसरा पर्यायच नसला, तर पश्चिमेकडे दरवाजा ठेवण्यासही हरकत नाही. घर बांधून काही जागा शेष राहील, याची दक्षता घ्यावी. उत्तर किंवा पश्चिमेकडचा भाग मोकळा ठेवल्यास चैतन्यात वाढच होईल.

संदर्भ : https://marathi.webdunia.com/

 

३. घराला कोणता रंग द्यावा ?

 

नवीन घर घेतांना सायंकाळी थकूनभागून कार्यालयातून आल्यावर मनाला विरंगुळा देणारे, शांतता देणारे असावे असे आपल्याला वाटते. घराला रंग देतांना घरात आल्यावर प्रसन्न वाटले पाहिजे, अशा रंगाची निवड करावी. घराला सात्त्विक तसेच उत्साहवर्धक रंग द्यावा. फिकट पिवळा, गुलाबी, आकाशी, बदामी हे रंग सात्त्विक आहेत. पांढरा रंग हा सुद्धा सात्त्विकतेच्या दृष्टीने चांगला आहे. पांढर्‍या रंगाच्या वास्तूकडे पाहिल्यावर पुष्कळ शांत आणि चांगले वाटते. असे असले, तरी अन्य रंग वापरायचे झाल्यास कोणत्या दिशेला कोणता रंग वापरू शकतो, याविषयी पुढील माहिती उपयुक्त ठरू शकेल.

 

४. घरासाठीच्या रंगांची दिशेनुसार निवड

रंगांची निवड घराची दिशा आणि घरमालकाचा जन्मदिनांक या दोन निकषांवर आधारित असावी लागते. प्रत्येक दिशेसाठी एक रंग ठरलेला असतो; परंतु कधीकधी तो घरमालकाच्या दृष्टीने योग्य नसतो. म्हणूनच घरमालकांनी वास्तूशास्त्रात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच रंगांची निवड करावी. यात पुढील सूत्रे महत्त्वाची असतात.

ईशान्य – फिकट निळा

पूर्व – पांढरा किंवा फिकट निळा

आग्नेय – या दिशेचा अग्नीशी संबंध असतो. त्यामुळे भगवा, गुलाबी किंवा चंदेरी रंग वापरून येथे ऊर्जा वाढवता येते.

उत्तर – हिरवा किंवा पिस्ता

वायव्य – या दिशेने वारे येतात. म्हणूनच या दिशेच्या खोल्यांचे रंग राखाडी आणि फिकट पिवळा(क्रीम) असलेले चांगले.

पश्चिम – ही वरुणाची म्हणजेच पाण्याची दिशा. त्यामुळे या दिशेचे सर्वांत चांगले रंग म्हणजे निळा आणि पांढरा

नैऋत्य – पीच, मातकट, ‘बिस्कीट’ किंवा हलका तपकिरी

दक्षिण – लाल आणि पिवळा

लाल किंवा गुलाबी रंग निवडतांना काळजी घेतली पाहिजे. कारण हे रंग प्रत्येक व्यक्तीला पोषक नसतात.

संदर्भ : ‘ए टू झेड वास्तू डॉट कॉम’

4 thoughts on “वास्तू आणि दिशा”

  1. अती सुंदर धन्यवाद खुप छान अभिनंदन बंधु

    Reply

Leave a Comment