गोपी रमल्या परमानंदी, श्रीहरीशी भावानुबंध अनुभवती क्षणोक्षणी ।
शिकवली सकळांस मधुराभक्ती, पदस्पर्शाने तयांच्या भूमी ही धन्य जाहली ॥
श्रीकृष्णासम सखा, गुरु, माय-बाप कोणी नाही, हे जो जाणतो, तो खरा भक्त ! भगवान श्रीकृष्णाला अनन्यपणे शरण जाणारा भक्त संसारसागरातून मुक्त होतो. श्रीकृष्णाप्रती उत्कट भाव वाढवण्यासाठी त्याच्या दिव्य जीवनाशी निगडित गोकुळ, वृंदावन आणि द्वारका या दैवी क्षेत्रांची छायाचित्रे येथे दिली आहेत. या छायाचित्रात्मक कृतज्ञतेच्या माध्यमातून श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवण्याचा प्रयत्न करूया !
जगद्गुरु श्रीकृष्ण म्हणजे साक्षात् पूर्णावतार ।
भक्ती, ज्ञान अन् कर्म यांचे परिपूर्ण भांडार ॥
गोपाळाच्या बाललीला अनुभवलेले गोकुळ !

भगवद्भक्तीने न्हाऊन निघालेले आणि कृष्णमय झालेले तीर्थक्षेत्र : वृंदावन !


श्रीहरीचे अस्तित्व अनुभवण्या या द्वारकेत !
