साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सध्या संपूर्ण जग आपत्काळाच्या उंबरठ्यावर आहे. युद्ध, नैसर्गिक आपत्ती, कोरोनासारखी रोगराई यांसारख्या विविध माध्यमांतून आपत्काळ कधीही येऊ शकतो. आजवर देवाने आपली साधना होण्यासाठी हा काळ थोपवून धरला आहे; पण तो आज ना उद्या येणारच आहे.
