भारतात पुन्हा एकदा ‘रामराज्या’ची गुढी उभारण्यासाठी कटीबद्ध होऊया !

रामराज्य, म्हणजे असे राज्य जिथे आध्यात्मिक श्रद्धा सुशासनामध्ये परावर्तित होते. आजच्या काळातही भारतात आदर्श राजा, सात्त्विक प्रजा, सुशासन आणि सुरक्षा असलेले रामराज्य आणणे, हीच खरी कालानुसार धर्मसंस्थापना आहे.

रथसप्‍तमी (Ratha Saptami 2026)

सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी `रथसप्तमी’ हा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्योपासना करायची असते.

अक्षय तृतीया (Akshay Tritiya 2026)

साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया या सणाचे महत्त्व तसेच या दिवशी करण्यात येणार्‍या तिलतर्पण, उदककुंभदान, मृत्तिका पूजन यांचे शास्त्रासह महत्त्व जाणून घेऊया.

जीवनाचे गुह्य ज्ञान शिकवणारी गुढी !

जीवनात काय साध्य करायचे आहे, याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढी हे त्यागमय जीवन जगण्याचे प्रतीक आहे. जीवनाचा आदर्श असलेली गुढी आपल्याला आपल्या जीवनाचे गुह्य ज्ञान दाखवते.

कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत दिवाळी कशी साजरी करावी ?

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेली दळणवळण बंदी उठवली जात असून जनजीवन पूर्ववत् होत असले, तरी काही ठिकाणी सार्वजनिक निर्बंधांमुळे नेहमीप्रमाणे दिवाळी साजरी करण्यास मर्यादा आहे. अशा ठिकाणी दिवाळी साजरी कशी करावी, याविषयीची काही उपयुक्त सूत्रे येथे देत आहोत.

विजयाची गौरवशाली परंपरा जोपासणारी प्राचीन भारतीय शस्त्रास्त्रविद्या !

विजयादशमीच्या निमित्ताने राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे अन् उपकरणे स्वच्छ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात.

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा यांचा काहीही संबंध नाही, हे जाणा !

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन लागोपाठ येतात. वर्ष २०१३ मध्ये खानदेश आणि मराठवाडा येथे काही जात्यंधांनी ‘गुढ्या उभारणे’, हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे, असे सांगत हिंदूंना गुढ्या उभारू दिल्या नाहीत आणि उभारलेल्या गुढ्या खेचून काढल्या.

प्रचलित पद्धतीने गुढी न उभारता धर्मध्वज उभारण्याचे धर्मशास्त्रविरोधी आवाहन !

आपण ज्याला ‘गुढी’ म्हणतो, त्याचे प्राचीन नाव ‘ब्रह्मध्वज’ आहे. त्यामुळे ‘ब्रह्मध्वजाचे पूजन’ असे म्हटले पाहिजे. ‘गुढी’ हा शब्द संस्कृत नाही, तर ‘पाडवा’ प्रतिपदेचा अपभ्रंश आहे.

त्रेतायुगातील गुढीपाडव्याविषयी भगवंताने सांगितलेला भावार्थ

पाडव्याला श्रीरामाच्या स्वागतासाठी उभ्या केलेल्या गुढ्या म्हणजे अयोध्येतील जनतेने श्रीरामाच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात घेतलेल्या सहभागाचे द्योतक आहेत.