ईश्वरप्राप्तीसाठी त्यागाचे महत्त्व !
तन-मन-धन यांचा त्याग आणि सर्वस्व अर्पण करण्याची सिद्धता यांद्वारे साधकातील अहंचा लय होऊ लागतो. त्याचे संचित आणि प्रारब्ध संपते. त्याला ईश्वराची प्राप्ती होते आणि त्याच्या जीवनाचे सार्थक होते.
तन-मन-धन यांचा त्याग आणि सर्वस्व अर्पण करण्याची सिद्धता यांद्वारे साधकातील अहंचा लय होऊ लागतो. त्याचे संचित आणि प्रारब्ध संपते. त्याला ईश्वराची प्राप्ती होते आणि त्याच्या जीवनाचे सार्थक होते.
‘मी दान देत आहे’, अशी भावना देतांना मनात असली, तर ते ‘दान’ होईल. दानामध्ये तीन गोष्टी आल्या. ती वस्तू स्वतःची असल्याचे मानणे, म्हणजे ममत्व आले; दान देण्याचे कर्तृत्व, म्हणजे कर्तेपणा आला आणि ‘मी दान देतो’, हा अहंकार आला.
‘पात्रे दानम् ।’ हे सुभाषित सर्वश्रुत आहे. दानाचा अर्थ ‘एखाद्याची मिळकत आणि त्यातून होणारा व्यय वजा करून शिल्लक रहाणार्या रकमेतून सामाजिक किंवा धार्मिक कार्याला केलेले साहाय्य’, असाही होतो.
‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करतांना एकाच वेळी सर्वस्वाचा त्याग करणे शक्य नसते; पण टप्प्याटप्प्याने तन, मन, धनाचा त्याग करू शकतो.
दान केल्यामुळे समष्टी पुण्य वाढणे, ईश्वरावरील श्रद्धा वाढणे, त्यागाची भावना निर्माण होणे, हे लाभ होतात.